7.6 C
New York
Monday, March 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

महायुतीच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

श्रीगोंदा सिटीझन   :  नगर

लोकसभा निवडणूक प्रचारासाठी महायुतीच्या वतीने नगर येथील कोहिनुर मंगल कार्यालय येथे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह निर्माण झाला असून मोठ्या जोमाने कार्यकर्ते कामाला लागल्याने डॉ. सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिकेतून लोकांच्या पुढे जा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे आणि त्याचा देशाच्या विकासात पडलेली भर याची माहिती लोकांना द्या. त्याच बरोबर महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेली विकासकामे, विविध योजना आणि जनतेचे सुटलेले प्रश्न लोकांना दाखवा. विरोधात कोण याचा विचार न करता केवळ पंतप्रधान मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करायचे आहे याचा विचार करून कामाला लागा असा संदेश यांनी यावेळी दिला.
यावेळी आमदार मोनिकताई राजळे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे, राष्ट्रवादी उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उपस्थित होते. रिपाई, शिवसेना आणि इतर घटक पक्षातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आलेल्या सर्व घटकपक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. तसेच निवडणूक प्रचारासाठी लावणारी सर्व मदत ही या कार्यालयातून केली जाईल असे सांगण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या